रविवार, १ जून, २०२५

फणसाच्या आठळ्याची भाजी

 तर मग झाल अस की फणस घरी आणवून, अस्मादिकाना टुकटुक करून, घरच्या मेंब्र गरे खाऊन मोकळी झाली . उरल्या त्या आठळ्या! आंब्यांच्या कोयीप्रमाणे त्या आठळ्या टाकून द्यायच्या नाहीत अस बजावून ठेवलेल होतेच. 

एक वेळच्या भाजीला पुरे होतील आणि भाजी शेजारी देता येइल इतपत आठळ्या जमा झाल्या . मग मुहूर्त जमवून आणला फणसाच्या आठळ्याच्या भाजीचा . 


कोकणात ही भाजी करतात . माझी आईची आई ही भाजी सुरेख करायची . आईलाही ही भाजी प्रचंड आवडायची.. त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला की एका रात्री हा  फक्कड बेत असायचा भाकरीबरोबर. आठळ्या फोडायचे काम आजोबांकडे असायचे. वाराप्रमाणे त्यात काळे वाटाणे/ सुका जवळा/ सुळे बॉम्बिल अशी पुरवणी असायची. जोडीला भाकरी , पिठल भात 


याची कृती अगदीच सोपी 

आठळ्या धुवून घ्याव्यात . खलबत्याने साधारण एक सारखे

करावेत. नेहमीची फोडणी करून कोकम घालून त्यावर आठळ्या परतून घ्याव्यात . खात असलात तर सुका जवळा, बॉम्बील टाकावे . प्रमाणानुसार गोडा मसाला घालावा आणि हवे तितके पाणी घालून वाफ काढावी. मीठ आणि हवे असल्यास कोथिंबीर घालून अंगसरशी भाजी करावी. 


हा फोटो





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फणसाच्या आठळ्याची भाजी

 तर मग झाल अस की फणस घरी आणवून, अस्मादिकाना टुकटुक करून, घरच्या मेंब्र गरे खाऊन मोकळी झाली . उरल्या त्या आठळ्या! आंब्यांच्या कोयीप्रमाणे त्य...