१९४१ साली गावाहून मुंबईत आलो. तेव्हा १५ - १६ वर्षाचा असेन . ग्रांटरोडला नातेवाईक मंडळीकडे राहत होतो . त्यांच्या ओळखीने मिलमध्ये कामास लागलो . वर्ष झालं .नंतर काँग्रेसच्या लोकांचे भाषण ऐकले. ते ऐकून आम्ही मुलांनी नाना चौकात जाऊन भारतमाता की जय बोललो . गांधीबाबा भारी होता . सभेत जाऊन भाषण ऐकायचो . मिलच काम कापसावर चालायचं . मग १९४७ साली इंग्रज निघून गेले . तेव्हा नाना चौकात मोठा जुलूस झाला . सगळीकडे दिवे लागले . पेढे वाटले. मिलच्या जॉबरने सांगितले तुम्हाला सुट्टी . मग आम्ही पोरे फिरायला निघालो. सगळीकडे आनंद होता. लोक खुश होते. काँग्रेसच्या लोकांनी आता आपले राज्य आले असे सांगितले . सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या . भारतमाता की जय म्हटले . नेहरू मंत्री झाला . त्यांच्यानंतर इंदिरा .
=========================================
माझ्या ९१ वर्षाच्या आजोबांचे नुकतेच निधन झाले. एकदा कौटुंबिक समारंभात विषय निघाला असता त्यांनी या आठवणी सांगितलेल्या . तब्येत बरी होती तेव्हा वयपरत्वे जेवढं त्यांना लक्षात होत त्यांनी सांगितलं . त्यामुळे थोडेसे विस्कळीत आहे . हे सगळं तेव्हा अचंबित होऊन लक्षात राहिलेलं . आजच्या दिवशी हे सगळं इथे सांगावसं वाटलं 😊