फूडोग्राफी / Foodography लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
फूडोग्राफी / Foodography लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १ जून, २०२५

फणसाच्या आठळ्याची भाजी

 तर मग झाल अस की फणस घरी आणवून, अस्मादिकाना टुकटुक करून, घरच्या मेंब्र गरे खाऊन मोकळी झाली . उरल्या त्या आठळ्या! आंब्यांच्या कोयीप्रमाणे त्या आठळ्या टाकून द्यायच्या नाहीत अस बजावून ठेवलेल होतेच. 

एक वेळच्या भाजीला पुरे होतील आणि भाजी शेजारी देता येइल इतपत आठळ्या जमा झाल्या . मग मुहूर्त जमवून आणला फणसाच्या आठळ्याच्या भाजीचा . 


कोकणात ही भाजी करतात . माझी आईची आई ही भाजी सुरेख करायची . आईलाही ही भाजी प्रचंड आवडायची.. त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला की एका रात्री हा  फक्कड बेत असायचा भाकरीबरोबर. आठळ्या फोडायचे काम आजोबांकडे असायचे. वाराप्रमाणे त्यात काळे वाटाणे/ सुका जवळा/ सुळे बॉम्बिल अशी पुरवणी असायची. जोडीला भाकरी , पिठल भात 


याची कृती अगदीच सोपी 

आठळ्या धुवून घ्याव्यात . खलबत्याने साधारण एक सारखे

करावेत. नेहमीची फोडणी करून कोकम घालून त्यावर आठळ्या परतून घ्याव्यात . खात असलात तर सुका जवळा, बॉम्बील टाकावे . प्रमाणानुसार गोडा मसाला घालावा आणि हवे तितके पाणी घालून वाफ काढावी. मीठ आणि हवे असल्यास कोथिंबीर घालून अंगसरशी भाजी करावी. 


हा फोटो





शुक्रवार, १४ मे, २०२१

पोह्याचे कटलेट / Poha Cutlet

काल सुट्टी / वेळ असल्याने काहीतरी चटपटीत आणि झटपट होणारं (फार वेळ न खाणारं) करू म्हणून नेट सर्फिंग केलं तेव्हा पोह्याचे कटलेट सापडले. साहित्याचा अंदाज घेतला तेंव्हा बरेचसे साहित्य घरात आहे अस लक्षात आलं. पोहा कटलेटच्या रेसिपी ढिगाने नेटवर सापडतील . कोणतीही रेसिपी फॉलो करू शकता. मी दोन तीन रेसीपी बघून शॉर्टकट मारला.

तर रेसिपी थोडक्यात अशी :
प्रथम बटाटे उकडवून त्याच्या साली काढून घ्या. पातळ पोहे भिजवून , पाणी निथळवून ५ मिनिटं बाजूला ठेवून द्या. आता त्या पोह्यात उकडलेल्या बटाटयाचा लगदा मिसळून घ्या. त्यातच हळद , मिरची पावडर , गरम मसाला , चाट मसाला, आलं लसूण पेस्ट , काळी मिरी पावडर , मीठ , कोथिंबीर , गाजर ( ऑप्शनल ) व्यवस्थित मिसळून घ्या. हा लगदा नीट मळून घेऊन त्याचे आवडीनुसार छोटे गोळे बनवून ठेवा. तयार झालेले हे गोळे कॉर्नफ्लोरच्या आणि ब्रेडक्रम्ब्सच्या मिश्रणात अनुक्रमे घोळवून घ्या. पॅनवर आवडीनुसार खरपूस शॅलो /डीप फ्राय करा .ओव्हनमध्ये बेकही करू शकता. सोबत सॉस किंवा चटणी. माझ्याकडे पुदिन्याची चटणी होती तिच्याबरोबर छान लागले हे कटलेटस.
प्रमाण : प्रत्येकाच्या आवडी आणि सवडीनुसार.

Yesterday, as it was a holiday / time, I was surfing the net to do something spicy (and of course would not take a long time for preparation). Internet suggested "Poha Cutlet". Then i had figured out about ingredients and realized that most of the ingredients were available. I read two / three recipes and took shortcut.

So here is the recipe :

First boil  potatoes and peel them. Soak Poha, drain the water and set aside for 5 minutes. Now mix the boiled potato pulp in that poha. Mix turmeric powder, chilli powder, garam masala, chaat masala, ginger garlic paste, black pepper powder, salt, cilantro, carrot (optional). Knead the pulp well and make small balls as per your liking.

Mix the prepared balls in a mixture of corn flour and breadcrumbs, respectively. Shallow / deep fry as you like in the pan. You can also bake in the oven. Serve with sauce or chutney. I had mint chutney and these cutlets went well with it.

Quantity: According to everyone's taste and preference

हा फोटो / Here is photo



गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

सखुबत्ता

 मैत्रिणीने कोणे एके काळी तिची हिट रेस्पि पोस्ट करावी, ती आपण बघून आपल्या आवाक्यातील आहे असे म्हणून मनातल्या मनात मांडे खावेत. पण रेस्पिच्या घटक पदार्थच आणि चालू वर्तमानतील घटकांच प्रमाण जुळून येऊ नये . मग आपल्या कुकरच्या शिट्टीसारख्या उतू चाललेल्या उत्साहावर फसकन पाणी पसरावं. पण आपण पण  हार न मानता छोडेंगे नै जी म्हणत ती रेस्पि बुकमार्क करून ठेवावी. 

काही काळानंतर  आपल्याला रेसीपीचे घटक पदार्थ आणि चालू वर्तमानातील पदार्थ घरात आहेत आहेत याचा साक्षात्कार व्हावा आणि टीशर्ट खोचून सज्ज व्हा उठा उठा , सैन्य चालले पुढे करत स्वयंपाकघरात एन्ट्री मारावी आणि मग बऱ्याच दिवसांनी पेंडिंग असलेला सखुबत्ता एकदाचा करावा. 

तर मैत्रिणीची   रेसिपी पुढीलप्रमाणे : 

कैर्‍यांची सालं काढून पातळ काचर्‍या कराव्यात. सोलाण्याने काचर्‍या केल्या तरी चालेल. तीळ भाजून त्याचे अर्धी वाटी कुट घ्यावे. कुटाइअतकाच कैरी लोणचे मसाला (बेडेकर, प्रविण किंवा इतर आपल्या आवडीप्रमाणे) घ्यावा. लोणचे मसाला नसेल तर लाल तिखटही चालेल . मी तेच घातलं आहे. अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जास्त गुळ किसून घ्यावा. गुळाचं प्रमाण अंदाजेचं चवीप्रमाणे ठरवा. कैर्‍यांच्या काचर्‍या, तिळाचं कुट, लोणचे मसाला, मीठ आणि गुळ एकत्र करावं. त्यात हिंग- मोहरीची फोडणी थंड करून घालावी. तयार होतो गोड आंबट स्लर्प चवीचा अप्रतिम सखूबत्ता! 


रोजच्या भाजीचा कंटाळा आला असेल , रोजच्या डाळभाताबरोबर आणि खूप काही न करता स्लर्प चव हवी असेल तर ही रेसिपी करावी . नुसती बचकाभर अशीच संपते. भांड्याचा तळाचा खारही चविष्ट लागतो आणि चाटून पुसून भांड अगदी स्वच्छ होतं. 


हा मी केलेल्या सखूबत्ताच्या फोटो आणि माझ्या मैत्रिणीच नाव  Alpana Khandare



मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

गाजराची पचडी

गाजर हा सॅलडमधील एक प्रमुख घटक . पण नुसतं रोज रोज गाजराचे तुकडे चावयलाही कंटाळा येतोच. मग त्या गाजराच्या तुकड्यांना थोडासा ट्विस्ट द्यायचा . कसा ? तर गाजराची पचडी बनवून .
कृती सोपी आहे.
गाजराचे बारीक तुकडे अथवा कीस करून घ्यावा. छोट्याश्या कढईत एक चमचा तूप तापवून घ्याव. त्यात मिरची , जिर तडतडवून घ्यावेत . तडतड करत असतानाच गाजर टाकावं . त्यात चवीनुसार मीठ , साखर घालावं . आणि मग मंद आचेवर वाफवून घ्याव.
मात्र अगदीच दणदणीत वाफ वगैरे काढायची नाही . फारतर अर्धा मिनिट . गाजर तस लगेच शिजत.
फारच लाड करायचे असतील तर खोबरं , कोथिंबीर घालून सजवू शकता अथवा लिंबाच्या रसाची ऍडीशन देखील चव खुलवू शकते .
पण शेवटी हे सॅलड आहे ध्यान्यात असू द्यावे
तर आज डब्यात असलेली गाजराची पचडी .
याच पद्धतीने काकडी, मुळा यांचीही पचडी करता येऊ शकेल असे वाटते .

रेसिपी सौजन्य - मायबोली साईटवरील माहिती 




लहान मुलीची लहान पोळी

 आज पोळ्या करण्याऱ्या काकूंनी ही गंमत केली आणि ते न सांगता. !.जेवायला बसत असताना पोळ्यांचा डबा उघडला आणि एकदम नॉस्टॅल्जिक फिलिंग आलं ..

लहानपणी आई आणि आजी माझ्यासाठी मुद्दाम लहान मुलीची लहान पोळी बनवत असतं . त्यामागे मी आकर्षण वाटून नीट खाईन असा हेतू असायचा . "फक्त तुझ्यासाठी केलेय बरं का " ही फोडणी असायची .आपल्यासाठी स्पेशल केलेय या फिलिंगने इतरांना तु क देत मी ही खात असे.. आता ते सारं आठवून हसू येतेय.
अजून एक म्हणजे भातुकली खेळत असताना प्रत्येकाने काहीतरी घेऊन यायचं असा अलिखित नियम असे . आजी तेव्हा मला कुरमुरे , फुटाणे किंवा ही छोटी पोळी तयार असेल तर देत असे. मज्जा यायची तेव्हा . सगळे आपलं आपलं घेऊन यायचे आणि एकदम काला सदृश्य काहीतरी तयार व्हायचं . पण ते सगळेजण मिटक्या मारत खायचो.
तर पोळीचा आकार बघून "अरें ! आपण इतके मोठे झालोय तर " असं फिलिंग देणारी ही छोट्या मुलांची छोटी पोळी..

This small roti was prepared by our maid today and same gave me nostalgic feelings.
My mother and Grandma used to prepare this little roti for me. Their Additional graft was "we prepared this only for you and NOT for anyone" . The only aim of theirs was to made me eat . I also enjoyed the process with the feeling of superlative.
Further in childhood , we used to play "Bhatukali " or playing house . The unwritten rule of Game was that everyone contribute something. My Grandma used to fund me murmura , chana or this little roti. Such a Crazy thing !!!
So here is small little roti which give me feeling that " oh ! Now I am so grown up...



पेज / खिमाट

पेज / खिमाट या नावाने ओळखल जाणारा हा कोकणचा स्टेपल फूड म्हणता येईल असा पदार्थ . आईच्या म्हणण्यानुसार तिच्या लहानपणी कोकणातील गावात न्याहारीला सर्रास पेज असायची . एक / दोन वाडगाभर पेज पिऊन माणसं शेतावर जायची. कधी मधी बदल म्हणून भाकरी आणि त्याच्या जोडीला सुक्या बांगड्याचा तुकडा .

मला मात्र पेज /खिमाट हे नेहमी आजारी असतानाच पदार्थ वाटत आलाय . आजारी पडल्यावर तोंडाची चव गेली की आई /आजी हमखास पेज करतात . त्या बरोबर किंचित लोणच्याच्या खार . गेलेली चव परत यायची गॅरेटी. कधी कधी तर खास पेज पिण्यासाठी आजारी पडावं अस वाटत . करायलाही अगदी सोपा असं . मात्र पेजेची खास चव येण्यासाठी तांदूळ मात्र गावचेच हवेत . एक वाटी तांदुळला 5 ते 7 वाट्या पाणी आणि त्यात चिमूटभर मीठ . ते आटून आटून एका पातळीला आलं की झाली पेज तयार .खिमाटसाठी अजून थोडं पाणी आटवायचं . एवढं सगळं झालं की वाडगाभर पेज ओरपायची .हो !ओरपायचीच .पेज /खिमाट काही नुसतं खायचा पदार्थ नाही . तो ओरपायचाच असतो .. वाडगा भरून पेज /खिमाट खाल्लं की दुपारपर्यतच्या वेळेची निश्चिती .

कारण नक्की काय ते माहीत नाही पण पेज /खिमाट शनिवारी करायची नाही असा दंडक आहे म्हणे आणि आई तो पाळते .त्यामुळे शनिवारी पेजेला बिग नो . घरी आम्ही आळशीपणा करत असलो आणि आजी कधी वैतागली तर तिच्या तोंडून 'वेळेला पेज आणि निजेला शेज ' असा शेरा हमखास बाहेर पडायचा . गंमत वाटायची तेव्हा ..
पेजेच थोडं नकारात्मक वर्णनही ऐकलं आहे . नुसत्या पेजेवर एखाद्याने दिवस काढले अस आजी कधी कधी जुन्या आठवणी सांगताना म्हणायची. ते सांगताना गळा दाटून आलेला असायचा तिचा . मधु मंगेश कर्णिकांच्या पुस्तकातही पेजेचा उल्लेख वाचलाय. एकंदरीतच पेज /खिमाट आणि कोकण यांचं नातं अतूट आहे .
तर आता वरील पेज/खिमाट पुराण ऐकल्यावर हा फोटो !



मंगळवार, २३ मार्च, २०२१

Neerdosa \ Ghavane\घावणे

तुला स्वयंपाकामधलं काय येतं अस कोणी मला विचारलं तर मला घावणे उत्तम जमतात अस उत्तर मिळतं. घावणे ही कोकणातील स्पेशालिटी . तांदूळ भिजवून , वाटून बिडाच्या / निर्लेप तव्यावर घावणे घालणं हे सुख.. त्यामुळे जेव्हा केव्हा पॉटलक इव्हेंट असतो तेव्हा न बिघडणारी , दगा न देणारी ही भरवश्याची म्हैस नेहमी तयार असते . याचे फायदे असे की i have made authentic cuisine of Konkan अस मिरवता येतं आणि भाव खाता येतो. 

If I am asked, what is your specialty in kitchen, then instant answer is Ghavane a.k.a Neerdosa. Ghavane a.k.a Neerdosa is konkan regional cuisine. . Recipe is simple. Soak  rice overnight, then grind, add some salt and spread the same on nirlep pad or bhidacha tawa. This is easy recipe and in which never failed by God's grace. 

So here presenting my  Neerdosa \ Ghavane\घावणे. Hope you like it 




सोमवार, २२ मार्च, २०२१

कुलक्की सरबत / kulukki Sarbath

 शरीरातील उष्णतेवर सब्जा हा रामबाण उपाय आहे. विशेषतः उन्हाळ्यात तलखीने जीव हैराण होत असताना सब्जा घालून पाणी प्यायलं की गार वाटतं.

केरळमध्ये सब्जा घालून कुलक्की सरबत ( kulukki Sarbath ) करतात. तिथलं हे लोकप्रिय पेय आहे. कुलक्की सरबत हे एक प्रकारचं shaken lemonade म्हणता येईल. मल्याळममध्ये कुलक्की या शब्दाचा अर्थ घुसळणे असा होतो. त्यावरून या पेयाला कुलक्की हे नाव पडलं. हे सरबत तयार करताना जितकं जोरात घुसळल / वर खाली हलवलं जाईल तितकी याची चव खुलते. ह्या पेयाच secret ingredient म्हणाल तर तेच आहे.


लागणारे जिन्नस: 

२चमचे सब्जा ,
एक ग्लास थंड पाणी जितकं सोसेल तितके,
१ लिंबू ,
१ हिरवी मिरची (ऊभी चिरलेली ) ,
बर्फाचे तुकडे ,
चवीनुसार मीठ , साखर , पुदीना


कृती : 2 चमचे सब्जा पाण्यात भिजवत ठेवा. सब्जा भिजेपर्यत एका ग्लासात लिंबाचा एक स्लाइस , एक उभी चिरलेली मिरची , पुदिना, चवीनुसार मीठ, साखर टाका. ह्यात आल्याचे बारीक तुकडे पण घालू शकता (ऑप्शनल). त्यानंतर त्यात लिंबाचा रस घाला. बर्फाचे तुकडे टाका.

ह्यावेळेपर्यत सब्जा पुरेसा भिजलेला असेल. तो ही या मिश्रणात टाकून मिश्रण हलकेसे हलवून घ्या. आता ग्लासात दोन बोट राहतील इथपर्यंतच पाणी ओता. लक्षात घ्या ग्लास पूर्णपणे भरायचा नाही . नाहीतर घुसळताना पाणी बाहेर पडेल. आता दुसरा एक ग्लास घेऊन तो मिश्रणाच्या ग्लासावर ठेवून अर्धा मिनिटं वर खाली चांगलं हलवून घ्या.पण जरा दमान कारण जोरात घुसळताना पाणी बाहेर पडायचे १०० % चान्सेस असतात. तुमच्याकडे Shaker असेल तर हे काम अगदी सोपं होतं.

तर आपलं साधं सोपं आंबटसर , गोडूस, तिखट अशी मिक्स चव असलेलं कुलुक्की सरबत तयार आहे. हे सरबत थंडगार प्यायला छान वाटत. हवं असल्यास थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर पिऊ शकता.

हे मी केलेलं कुलक्की सरबत / kulukki sarbat






शनिवार, ११ जुलै, २०२०

Cumin lemon cool drink ..







Roast Cumin in pan as your strong / mild flavor . Then pour water . Boil it for 10-15 minutes . Grind it in mixer . Then strain it if you want .

Take a glass . Drop some cube ice or crushed ice . Pour that cumin extract as per your taste . Squeeze
 lemon . Add sugar /Jaggery as per your choice . Then mix with normal salt as well as black salt . Then add water .. Simple ..
Your Cumin lemon cool drink is ready .

This drink is looks alike brownish to yellow based your roasting and addition of water. 

Egg 65 .





I have seen this recipe on Banglar Rannaghor page and tried the same. Believe me its a good starter for party, dinner. It requires less effort and you can have a restaurant starter dish at your home.

Ingredients 
1) 6 Eggs boiled 
2) 1/2 tea spoon red chilli. 
3) 1/2 tea spoon of salt 
4) 1/4 tea spoon chopped garlic 
5) 1/4 tea spoon chopped ginger
6) 1/4 tea spoon chopped curry leaves
7) 1 chopped green chilli
8) 4 tea spoon maida
9) 2 tea spoon bread crumbs
10) 1 egg white 
11) 1/2 tea spoon garam masala
12) Oil

Step 1 : Egg Balls 
Take boiled eggs. make it into 2 parts . Remove yolk. Cut white part of egg in a very small pieces in a bowl. Add red chilli , salt ,garlic , ginger , curry leaves, green chilli, maida , bread crumbs into it. Mix it well. Add egg white and garam masala into mixure. Again mix it well. 
Now make small balls of that mixure. Heat the pan , pour a oil into into. Once it is sufficiently heated, drop those balls into oil. Fry until golden brown. Then keep them on paper towel. 

Step 2 :  Sauce
For that take 2 table spoon of oil. Add 2 cloves of chopped garlic , 3 red dry chilli. Fry it until garlic gets golden.  Then add 8-10 pieces of curry leaves and 8 table spoon of tomato ketchup . Mix it well. Add pinch of salt to taste. 
Now finally add our fried eggs balls into sauce. For garnishing add  1 chopped green chilli and some coriander. 
Our delicious yummy Egg 65 is ready to it 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ही रेसिपी  मी  Banglar Rannaghor  या पेजवर पाहिली होती. पाहुन झाल्यावर सोप प्रकरण वाटल म्हणून म्हटल करून बघूयात. ही रेसिपी  पार्टी / डीनरसाठी एक  उत्तम स्टार्टर आहे. तुलनेने कमी वेळात होणारी तरीही रेस्टॉरंटचा फील देणारी आखूडशींगी बहुगुणी अशी हि रेसिपी ...
सामग्री
१) ६ ऊकडलेली अंडी
२) 1/2 टी स्पून लाल तिखट 
३) 1/2 टी स्पून  मीठ
४) 1/४ टी स्पून बारीक केलेल लसून
५)  1/४ टी स्पून बारीक केलेल आलं
६) 1/४ टी स्पून बारीक केलेला कढी पत्ता
७) 1 बारीक केलेली हिरवी मिरची
८) ४ टी स्पून मैदा
९) ब्रेड क्रम्ब
१०) १ अंड्याचा पिवळा भाग 
११) 1/2 टी स्पून गरम मसाला 
१२ ) तेल 

Step 1 : Egg Balls 

सर्वप्रथम उकडलेली अंडी घेऊन तिचे २ तुक्डे करा. पिवळा भाग काढून  टाका. अंड्याच्या पांढर्या भागाचे अत्यंत छोटे छोटे तुकडे एका भांड्यात करुन घ्या. त्यात लाल तिखट, मीठ,लसून्ण्,आलं , कढी पत्ता, हीरवी मिरची, ब्रेड क्रम्ब, मैदा मिसळा. चांगल मिसळून घ्या. नंतर अंड्याचा पिवळा भाग , गरम मसाला त्या मिश्रणात टाका. पुन्हा चांगल मिसळून घ्या. 
आता त्या मिष्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून  त्यात  ते गोळे सोडा आणि सोनेरी होईपर्यत तळा. सोनेरी झाले की पेपर टॉवेलवर निथळत ठेवा

Step 2 :  Sauce. 
सॉस बनवण्यासाठी २ चमचे तेल पॅनमध्ये गरम करून घ्या. त्यात २ बारीक केलेल्या लसणीच्या पाकळ्या, लाल सुकलेल्या मिरचिचे तुकडे टाका. लसूण सोनेरी होईपर्यत तळा. ८/१० कढीपट्याची पाने  आणि १० चमचे टोमॅटो सॉस मिसळा. किंचित  मीठ टाका आणि चांगल मिसळून घ्या. 
फायनली अंड्याचे गोळे त्या सॉसमध्ये टाका. सजावटीसाठी १ बारीक कापलेली हिरवी मिरची आणि थोडि कोथंबीर वरुन घाला. 
आपली चविष्ट Egg 65  डिश  तयार आहे. 
 




10 minutes Cheese Garlic Breadstick with Tea




मंगळवार, ७ जुलै, २०२०

फोडणीचा / मसाले भात ~Fodnicha Bhaat / Masale Bhaat


फोडणीचा / मसाले भात ~Fodnicha Bhaat / Masale Bhaat 

माझी आई नोकरी करायची . त्यामुळे रोजच शाळेत पोळी भाजी , चपातीचा डबा देणं तिला जमायचं नाही. रोज रोज चपाती भाजी खाऊन आम्हालाही कंटाळा यायचा. पास्ता , मॅगी , मॅक्रोनीला शाळेत अघोषित बंदी होती आणि तसेही ९० च्या दशकात हे पदार्थ रुळले नव्हते तितके . त्यावर तोडगा म्हणून एक दिवस हा फोडणीचा भात डब्यात असायचा. आदल्या रात्री आई मुद्दामहु
न भात जास्त करायची आणि सकाळी हा भात डब्यात असायचा.. ज्या दिवशी फोडणीच्या भाताचा डबा असायचा त्यादिवशी मी जामच खुश असायचे. मला दोन दोन डब्बे दे असा माझा हट्ट असायचा तेव्हा. पुढे मोठं झाल्यावर भाताने वजन वाढत असा शोध(?) लागला त्यामुळे भात खाणं कमी केलं . पण शेवटी जीन्स पडले कोकणी माणसाचे . राहवणार थोडंच भाताशिवाय . त्यामुळे संकल्प बारगळला.😛😛

हा पदार्थ करायला एकदम सोपा. आवडता पदार्थ असल्याने आई करायची तेव्हा तिच्या बाजूला उभं राहून बघितलं होतंच . फोडणीचा नुसता सुगंध भूक चाळवतो . तर कढईत चवीनुसार लाल तिखट कांदा टोमाटो, लसूणची फोडणी करायची , हळद ऑप्शनल . आणि उरलेला भात त्यात टाकून मस्तपैकी परतून घ्यायचा. वर थोडावेळ गॅसवर ठेवून खायला घ्यायचा . अहाहा ! कसली भारी चव लागते . खरतर उरलेला भात खपावा म्हणून ही युक्ती करतात पण मी ताज्या भाताचंही कधी कधी करते . चवबदलीसाठी . पुलाव वगैरे करायला जेवढे श्रम लागतात त्याच्या अर्ध्याहून कमी श्रमात हा भात होतो आणि चविष्टही लागतो . आज केलेल्या फोडणीच्या भाताचा फोटू ! एन्जॉय 😎

  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

My Mother was working woman . So everyday it was not possible for her to do Poli Bhaji for our school tiffin . We were also sometimes got bored by eating same. Further our school didn't allow pasta , Maggie in tiffin.So My mother had this idea . All she had to do is cook some extra rice on earlier day and make this stuff on next morning . I used to be very happy on that day and asked my Aai to get me extra tiffin.

Later on I found that Rice was responsible for gaining weight , hence stopped eating . However being pure konkanni , i couldn't restrained myself from that very long 😛.

Receipe is very simple. All you have to do is take Pan . Pour some oil , put Laal Tikhat ,chopped onion , tomato and garlic into it. . Turmeric is optional . Then put leftover rice into the pan and mix it well. Keep the same in gas for sometime..Your Fodnicha Bhaat is ready . See how simple it is !!! Easier to made than pulav and other type of rice delicacy ..

So here is photo of today's Fodnicha Bhaat... Enjoy
 😊

सोमवार, ६ जुलै, २०२०

साबुदाणा वडे / sago vada

महाराष्ट्रात ऊपवास म्हटल की साबुदाणा पदार्थ हे समीकरण ठरलेल आहेच.

साबुदाण्याचे खिचडी,  वडे , ऊसळ असे  प्रकार आहेत.  त्यापैकी आज   मी साबुदाणे वडे केलेत. तर ते कसे करायचे ते पाहू
.
साबुदाणा वडे / Sago Vade

कृती

१) साबुदाणे : मी  अर्धा किलो साबुदाणा भिजत घातलेला. 
2) शेंगदाण्याच कूट  : पाऊण कप
3) ऊकडलेले बटाटे : एकूण ४ ( बटाटे बर्‍यापैकी मोठे होते. त्यामुळे ते पुरले. तुम्ही बटाट्याच्या आकारानुसार कमी जास्त करु शकता )
4) हिरव्या मिरच्या : बारीक मध्ये कापलेल्या . जीभेला झेपेल त्यानुसार
5) मीठ : चवीनुसार
6) तळणासाठी तेल आणि कढई . जिर हव असल्यास घालू शकता ,

 आदल्या रात्री किन्वा ३ तास आधि भिजत घातलेला साबुदाणा स्वछ धुवून घ्यावा.  एका  भांड्यात साबुदाणा,  ऊकडलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट, मिरच्या,  मीठ, जिर् छानपैकी  मिसळून घ्याव आणि एकजिव कराव . त्या मिश्रणाचे हव्या त्या आकारात गोळे / वडे करावेत.

कढईत तेल तापवून घ्याव . आणि हे गोळे / वडे  त्यात सोडावेत आणि सोनेरी रंगाचे होईपर्यत तळावेत.  हे वडे करपू नयेत  म्हणून तापल्यावर आच मंन्द करावी आणि वडे तळावेत.

हे वडे तुम्ही टोमटो  सॉस  किंवा दह्यासोबत खाऊ शकता.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

In Maharashtra Sago Vada is a recipe which is common on Fasting Days. Along with this Sago Kichadi and Usal are also favorite. Today we are going to see recipe of Sago Vada. 

1) Sabudana : I soaked half kilo on prior night. You may soak it for minimum 3 hours if you forget to soak on earleir day

2) Roasted Peanut Powder : 3/4 Cup 

3) Potato : 4 Boiled and mashed. You can adjust it according to size of Potato 

4) Sliced Green Chills according to your taste . 

5) Pinch of salt and Oil along with pan for frying.

You may also add cumin if you want. 


Take Soaked sago in large bowl . Drain the water . Add Roasted peanut powder, Mashed potato , Sliced Green Chilly , Pinch of salt. Mix  and mash well. Make Vada. 

Heat Oil in the Pan. Leave these balls in it and fry till golden brown . Fry it on medium heat so that it would not taste bitter.

 You can have these wada with either sauce or curd. 



आठवणीतील स्वातंत्रदिन!

 १९४१ साली गावाहून मुंबईत आलो. तेव्हा १५ - १६  वर्षाचा असेन . ग्रांटरोडला नातेवाईक मंडळीकडे राहत होतो . त्यांच्या ओळखीने मिलमध्ये कामास लागल...