शनिवार, ११ जुलै, २०२०
The Salisbury Poisonings !
"In 2018 , people of Salisbury were faced with unprecedented crisis .A chemical weapon attack on British City. " These lines flashes up at the start of new BBC drama "The Salisbury Poisonings."
This 4 episode drama narrates what actually happened in "spy attack " which normally we used to hear in Cold War era .
One Russian double agent named Sergei Skripal along with his daughter were poisoned in the city of Salisbury, England with a Novichok nerve agent. Detective Sargent named Nick Belly was also got contaminated while probing the attack . All these 3 people got recovered from attack . However later on ,one tragedy stroked when one British National named Dawn Struguss died due to high exposure of nerve agent.
At initial level , UK authorities were in dark about how this happened as they got no clue . But soon they found out "A Russian Hand" which started accusations by Britain on Russia and series of punitive measures against Russia, including the expulsion of diplomats. As expected , Russian denied these charges .
The Drama revolves around with Beginning of attack , Response of British Authorities , Panic Situation of British People , Media , Business , Lives of People at Stake, National interest, international politics . Series describes "effect of Lock-down " on Salisbury which rest of the world is facing nowadays . Since it is BBC produced drama , they as usual excelled . 4 episode series ensures that audience would not get bored with pile of information and includes some dramatic scene but same time it doesn't crosses sobriety. Visual Treatment of the show is soothing . An opt use of background music adds value to intense scenes . Actors acted well avoiding risk of overacting thanks to constructively implementation screenplay . This can be seen in series where Tracy , Nick belly are shown normal people like us which later on complimented as "Hero " for their efforts . The cost of heroic act is that Nick Belly has to abandoned his home due exposure of never agent.
Last episode shows the real-life characters and what has happened to them in the past two years.
Overall "The Salisbury Poisonings " is perfectly well written and acted. A series which one shouldn't missed.
Series is available on Netflix
कोकणातले घर / A House in Konkan
मंगळवार, ७ जुलै, २०२०
फोडणीचा / मसाले भात ~Fodnicha Bhaat / Masale Bhaat
![]() |
| फोडणीचा / मसाले भात ~Fodnicha Bhaat / Masale Bhaat |
माझी आई नोकरी करायची . त्यामुळे रोजच शाळेत पोळी भाजी , चपातीचा डबा देणं तिला जमायचं नाही. रोज रोज चपाती भाजी खाऊन आम्हालाही कंटाळा यायचा. पास्ता , मॅगी , मॅक्रोनीला शाळेत अघोषित बंदी होती आणि तसेही ९० च्या दशकात हे पदार्थ रुळले नव्हते तितके . त्यावर तोडगा म्हणून एक दिवस हा फोडणीचा भात डब्यात असायचा. आदल्या रात्री आई मुद्दामहुन भात जास्त करायची आणि सकाळी हा भात डब्यात असायचा.. ज्या दिवशी फोडणीच्या भाताचा डबा असायचा त्यादिवशी मी जामच खुश असायचे. मला दोन दोन डब्बे दे असा माझा हट्ट असायचा तेव्हा. पुढे मोठं झाल्यावर भाताने वजन वाढत असा शोध(?) लागला त्यामुळे भात खाणं कमी केलं . पण शेवटी जीन्स पडले कोकणी माणसाचे . राहवणार थोडंच भाताशिवाय . त्यामुळे संकल्प बारगळला.😛😛
हा पदार्थ करायला एकदम सोपा. आवडता पदार्थ असल्याने आई करायची तेव्हा तिच्या बाजूला उभं राहून बघितलं होतंच . फोडणीचा नुसता सुगंध भूक चाळवतो . तर कढईत चवीनुसार लाल तिखट कांदा टोमाटो, लसूणची फोडणी करायची , हळद ऑप्शनल . आणि उरलेला भात त्यात टाकून मस्तपैकी परतून घ्यायचा. वर थोडावेळ गॅसवर ठेवून खायला घ्यायचा . अहाहा ! कसली भारी चव लागते . खरतर उरलेला भात खपावा म्हणून ही युक्ती करतात पण मी ताज्या भाताचंही कधी कधी करते . चवबदलीसाठी . पुलाव वगैरे करायला जेवढे श्रम लागतात त्याच्या अर्ध्याहून कमी श्रमात हा भात होतो आणि चविष्टही लागतो . आज केलेल्या फोडणीच्या भाताचा फोटू ! एन्जॉय 😎
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
My Mother was working woman . So everyday it was not possible for her to do Poli Bhaji for our school tiffin . We were also sometimes got bored by eating same. Further our school didn't allow pasta , Maggie in tiffin.So My mother had this idea . All she had to do is cook some extra rice on earlier day and make this stuff on next morning . I used to be very happy on that day and asked my Aai to get me extra tiffin.
Later on I found that Rice was responsible for gaining weight , hence stopped eating . However being pure konkanni , i couldn't restrained myself from that very long 😛.
Receipe is very simple. All you have to do is take Pan . Pour some oil , put Laal Tikhat ,chopped onion , tomato and garlic into it. . Turmeric is optional . Then put leftover rice into the pan and mix it well. Keep the same in gas for sometime..Your Fodnicha Bhaat is ready . See how simple it is !!! Easier to made than pulav and other type of rice delicacy ..
So here is photo of today's Fodnicha Bhaat... Enjoy 😊
Unorthodox : मस्ट वॉच सिरिज ऑफ नेट्फ्लिक्स !!!
दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीमुळे आणि शेक्सपिअरच्या मर्चंट ऑफ व्हेनिसमुळे ज्यूबद्दलच कुतूहल आहेच . मोठ्या प्रमाणात नरसंहार होऊनही चिवटपणे जगत राहण्याच्या त्यांच्या कृतीच कौतुक वाटत.. याच ज्यूंच्या घेत्तोतील पोलादी पडद्याआड असलेल्या जगाची झलक दाखवायच काम Unorthodox नावाची नेटफ्लिक्सवरील सिरीज करते.
ब्रूकलिन नावाच्या अमेरिकेतील शहरात नवीन लग्न झालेली एस्टी शापिरो नावाची ज्यूईश तरुणी आपल्या नवऱ्याबरोबर राहतेय. चालरीतीप्रमाणे चारचौघीसारख लग्न झालेलं. नव्या नवलाईचा भर ओसरून गेल्यावर सगळेच बाळाच्या प्रतिक्षेत ( हम्मम ! Sounds familiar know 😛) .स्त्रियांना मखरात बसवून त्यांच्याकडून कौटुंबिक , प्रजोत्पादनाची काम करवून घेणं हा जगभरातील तमाम धर्माचा एकमतीय अलिखित नियम . एस्टीची सटमार हासिडीक कम्युनिटीही त्याला अपवाद नाही. किंबहुना दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या ज्यू नरसंहारानंतर 'योग्य वयात लग्न होऊन मुलं जन्माला घातलीच पाहिजेत ' च हमरिंग सतत कम्युनिटीतिल मुलींवर केलं जातंय आणि त्याही त्या योग्य आहेत असच मानत आहेत.जोडीला Husband is King च पालुपद आहेच. एस्टीही त्याला अपवाद नाही.. त्यामुळे अर्ध्या वाटेवर संसार मोडून गेलेल्या आईला ती स्वतःच्या वडिलांच्या व्यसनाधीनतेच कारण ठरवते ते ही आईची बाजू ऐकून न घेताच.
या अल्ट्रा ऑर्थोडोक्स असलेल्या सटमार हासिडीक कम्युनिटीत दुहेरी आयुष्य जगत असलेल्या एस्टीची कुंचबून जगण्याची धडपड चालूच आहे. एकीकडे स्वतःला समाजाच्या आदर्श पत्नीच्या व्याख्येत फिट बसवायच आहे तर दुसरीकडे भाडेकरूकडे असलेल्या पियानोचे स्वरही खुणावत आहेत अश्या कात्रीत एस्टी सापडते . बर समाजाचा कट्टरपणा इतका की कोणालाही साधं यू ट्यूब बघण्याची देखील परवानगी नाही . ते ही अमेरिकेसारख्या प्रगत देशात राहूनही . कोशर सर्टिफिकेट असलेलं अन्न , घेत्तोत राहून आपल्या परंपरा जपण्याचा असलेल्या दुराभिमानाने व्यक्तीस्वातंत्र्य नावाच्या मूल्याला कधीच केराची टोपली दाखवलेली आहे. धनाढ्य सासर , नवरा असूनही एस्टी खुश नाही (इकडच्या भाषेत खायला प्यायला ल्यायला बेसुमार असूनही सुख बोचतेय ही गत
;) ) . कुठेतरी काही कमी आहे , आपली ओळख स्वतःलाच झालेली नाही अस तिला सारख वाटत . त्यात सासू आणि नवऱ्याच्या त्याचबरोबर उरलेल्या समाजाचा मुलं होण्यासाठीचा दबाव आहेच . शेवटी हा ताण असह्य होऊन काही साठवलेले पैसे घेऊन एस्टी शापिरो पळून जायचं ठरवते आणि ते प्रत्यक्षात आणते . मात्र ती पळून जाते ज्यूच्या इतिहासात खलनायक असलेल्या जर्मनीत ! तिचा समाज सहजासहजी तिचं पळून जाण स्वीकारत नाही . तिच्या नवऱ्याला परत आणायच्या कामगिरीवर पाठवलं जातं ..या प्रवासात तिची तिला नव्याने ओळख होतेच . पण स्वतःच्या मर्यादांची , न कळत स्वतःही फॉलो करत असलेल्या ज्यूंच्या कट्टर तेचीही जाणीव होते. एस्टीच्या या जाणीव नेणिवेचा प्रवास म्हणजे Unorthodox ..
समाजात होत असलेल्या घुसमटीतून पळून जाणं इतपत या मालिकेची ढोबळ स्टोरीलाईन नक्कीच नाही. या प्रवासात एस्टीच्या स्वतःच्या समजुतीना हादरे बसतात .उदाहरणार्थ जर्मनीत गेलेल्या एस्टीला तिचा नव्याने ओळख झालेला मित्र समुद्रापल्याड असलेला एक बंगला दाखवतो . तो तोच बंगला असतो जिथ नाझीच्या बैठका होऊन हॉलोकास्टला आकार दिला जातो . तो बंगला बघून एस्टी हादरते . आपल्या मारल्या गेलेल्या नातेवाईकांची आठवण होऊन तिच्या अंगावर शहारे येतात . पण तरीही ती पाऊल पुढे टाकते . त्या समुद्रात स्वतःला झोकून देतेच पण ज्यूईश परंपरेनुसार लग्न झाल्यानंतर टक्कल करून चढवलेला तिचा केसांचा विगही फेकून देते . ह्या मुक्ततेचे बंध मग एस्टीला इस्त्रायलमध्ये वाढलेल्या एमिलीच्या ' अजून किती दिवस हॉलोकास्टमध्ये रमणार आहोत, कुरवाळत बसणार आहोत ' या प्रश्नाला उत्तर देताना विचार करायला बळ देतात .
मात्र एस्टी ही एक हाडांमासांची बाई आहे. लहानपणापासून झालेले ज्यूईश संस्कार इतक्या सहजपणे मोडायला ती धजावत नाही . त्यामुळे गरोदर आहे कळल्यावर ती अबोर्शनचा पर्याय नाकारते. मुळाना हादरे बसत असतानाच तिला त्यातलं जुनं सगळंच टाकून द्यायचं नाहीये पण नवीनही स्वीकारायच आहे. हा तिचा प्रवास अत्यन्त तरलतेने दाखवला आहे. एस्टीचे पहिल्यांदाच जीन्स घालतानाचे , लिपस्टिक लावायचे , क्लबात जायचे प्रासंगिक तुकडे स्क्रीनवर देखणे ठरलेत ते यामुळेच.. स्वतःच्या मर्यादित असलेल्या अक्षर ओळखीचं , कचकड्याच्या श्रीमंतीचं बाहेरील उघड्या जगात फार स्थान नाही , स्वतःचा मार्ग स्वतःलाच शोधावं लागेल हे एस्टीच आत्मभानही पडद्यावर सुरेखरित्या उतरलय.
कथेप्रमाणेच दाद द्यायला हवी ती कथेच्या सादरीकरणला . अगदी छोट्यातील छोट्या गोष्टीच केलेलं डिटेलिंग व्हॅल्यू ऍडीशनला चारचांद लावत. सिरीजमध्ये दाखवलेली shtreimels (fur hats), payots (side locks) ते हासिडीक ज्यूंची स्पेशलाईज्ड घर बघून दिग्दर्शक , निर्माते यांच्या मेहनतीला १०० टक्के मार्क्स द्यायलाच हवेत . अगदी ज्यूंच लग्न , त्यांच्या अंग घुमवत म्हणलेल्या प्रार्थनाही साग्रसंगीतपणे दाखवल्यात. उच्च निर्मितीमूल्ये असलेली ही मालिका त्यामुळेच प्रेक्षणीय बनते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या मालिकेच्या निर्मात्या ,दिग्दर्शक , पटकथालेखक , वेशभूषा संकल्पक सगळ्या स्त्रियाच आहे. त्यामुळेच की काय एक नजाकतीदार अनुभव पाहायला मिळतो 😎
शेवट काहीसा अपेक्षित असला तरीही तो घिसापिटा होत नाही तो सादरीकरणामुळेच . सर्वच कलाकारांची कामे उल्लेखनीय आहेत . विशेष उल्लेख करायला हवा तो एस्टीची भूमिका केलेल्या Shira Haas हिचा . काहीवेळेला संवादापेक्षा तिचे डोळे बोलतात . ते इतकं प्रभावीपणे तिने केलेय की आताच्या आत जाऊन तिला एक घट्ट मिठी मारावी अस वाटू लागतं. आपण पळून का आलो याच कारण सांगतानाचा “God expected too much of me. Now I need to find my own path.” तिचा मुद्राभिनय अतिशय सुरेख . सहकलाकारांनीही उत्तम साथ दिलेली आहे . तिच्या नवऱ्याची भूमिका केलेल्या amit rakavh या अभिनेत्यानी बायकोला साथ तर द्यायचीये पण समाजाला पण फॉलो करायचंय ही द्विधा भूमिका पडद्यावर उत्तमरित्या साकारलीये.
एकंदरीत चिरपरिचित नसलेल्या ज्यूंच्या आयुष्याचे अपरिचित तुकडे या मालिकेत पाहायला मिळतात . प्रगत असूनही हा समाज परंपरांना इतका घट्टपणे चिकटून आहे ते ही व्यक्तीस्वातंत्रांचा , स्त्रियांच्या भावनांचा बळी देऊन . ते पाहून तुलनेने अप्रगत असलेल्या इतर मानवी समाजात इतकी कट्टरता , इतका अन्याय का याच उत्तर सापडू लागत . नकळतपणे आतून हलायला होतं..तर एक देखणी तरीही आतून अस्वस्थ करणारी ही मालिका मस्ट वॉच कॅटेगरीत टाकायलाच हवी..
:)
सोमवार, ६ जुलै, २०२०
साबुदाणा वडे / sago vada
साबुदाण्याचे खिचडी, वडे , ऊसळ असे प्रकार आहेत. त्यापैकी आज मी साबुदाणे वडे केलेत. तर ते कसे करायचे ते पाहू .
| साबुदाणा वडे / Sago Vade |
कृती
१) साबुदाणे : मी अर्धा किलो साबुदाणा भिजत घातलेला.
2) शेंगदाण्याच कूट : पाऊण कप
3) ऊकडलेले बटाटे : एकूण ४ ( बटाटे बर्यापैकी मोठे होते. त्यामुळे ते पुरले. तुम्ही बटाट्याच्या आकारानुसार कमी जास्त करु शकता )
4) हिरव्या मिरच्या : बारीक मध्ये कापलेल्या . जीभेला झेपेल त्यानुसार
5) मीठ : चवीनुसार
6) तळणासाठी तेल आणि कढई . जिर हव असल्यास घालू शकता ,
आदल्या रात्री किन्वा ३ तास आधि भिजत घातलेला साबुदाणा स्वछ धुवून घ्यावा. एका भांड्यात साबुदाणा, ऊकडलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट, मिरच्या, मीठ, जिर् छानपैकी मिसळून घ्याव आणि एकजिव कराव . त्या मिश्रणाचे हव्या त्या आकारात गोळे / वडे करावेत.
कढईत तेल तापवून घ्याव . आणि हे गोळे / वडे त्यात सोडावेत आणि सोनेरी रंगाचे होईपर्यत तळावेत. हे वडे करपू नयेत म्हणून तापल्यावर आच मंन्द करावी आणि वडे तळावेत.
हे वडे तुम्ही टोमटो सॉस किंवा दह्यासोबत खाऊ शकता.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आठवणीतील स्वातंत्रदिन!
१९४१ साली गावाहून मुंबईत आलो. तेव्हा १५ - १६ वर्षाचा असेन . ग्रांटरोडला नातेवाईक मंडळीकडे राहत होतो . त्यांच्या ओळखीने मिलमध्ये कामास लागल...
-
तर लहानपणापासून चहा हवाच असं काही ठरलेलं नव्हतं आणि ठरलेलं नसल्याने काही एक अडायचं नाही . मुळातच लहान मुलांना चहा मिळायचाच नाही . दूध पिणं...
-
१९४१ साली गावाहून मुंबईत आलो. तेव्हा १५ - १६ वर्षाचा असेन . ग्रांटरोडला नातेवाईक मंडळीकडे राहत होतो . त्यांच्या ओळखीने मिलमध्ये कामास लागल...
-
शरीरातील उष्णतेवर सब्जा हा रामबाण उपाय आहे. विशेषतः उन्हाळ्यात तलखीने जीव हैराण होत असताना सब्जा घालून पाणी प्यायलं की गार वाटतं. केरळमध्य...





