सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४

टेडी बेअर : १



आज जरा उशिराच जाग आली. बाहेरच्या सूर्याचा प्रकाश आता डोळ्यावर यायला लागला. कण्हतच मी उठून बसले. समोर बघितल तर पपा उशाशी होते. त्यांच्याकडे पाहताच मला भरुन आलं. पप्पांनी शांतपणे मला थोपाटलं. मी त्यांच्या कुशीत शिरुन रडू लागले.

मी दीपाली साखरदांडे!!! शहरातल्या सुप्रसिध्द वास्तुविशारद शरद साखरदांडे यांची मी मुलगी. आमची फर्म साखरदांडे अ‍ॅन्ड असोसिएट्स ही आर्किक्टेचरमधल एक नावाजलेल नाव.शहरातल्या नामांकित ईमारतीच आराखड्याच काम पपांच्या नावे होतं. केवळ या क्षेत्रापुरत मर्यादित राहता प्रत्यक्ष बांधकामात उतरण्याचा पपांचा मनोदय होता. त्यासाठी ते तयारीही करु लागले होते. समीर म्हणजेच माझ्या भावाच्या सिव्हील ईजिनीअरच्या डिग्रीची वाट पाहत होते. बावीस वर्षे या क्षेत्रात काढल्याने पपांना या क्षेत्राचा चांगलाच अनुभव होता. मीही पपांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी आर्किक्टेचरची डिग्री घेतली होती. आमच्याच फर्ममध्ये डायरेक्टर म्हणून काम पाहात होते,

पपाना आता खरतर निवृत्तीचे वेध लागले होते. अलिकडे त्यांना फारच दमायला होई.ममी असायच्या तरी त्यांना फार एकट वाटायच. म्हणूनच करत असलेली नोकरी सोडून मी ईथे परतले होते. ममीनीच बोलावून घेतल होत. समीर शिक्षणानिमीत्त बाहेरच असायचा. त्यामुळे सोबतीला तसच कामाचा भार हलका करण्यासाठी मी आले होते. समीरच शिक्षण पूर्ण होताच आम्हा दोघावर कामाची वाटणी करुन देण्यात होती. ममीचीही तीच ईच्छा होती.

तेवढ्यात सरुताई आल्या.सरुताई माझ्या लहानपणा पासून घरात वावरलेल्या. अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले.पण समीर आलाय हे सांगताना त्यांचा श्वास अडकला." दीपा समीरबाबा आलाय गं" हुंदका देत त्यांनी कसबस सांगितल.

मी पपाकडे पाहिल पण पपा ममीच्या फ़ोटोकडे पाहत हरवले होते.
मी मानेनेच सरुताईना खूण केली
"हा फ़ोटो बघितलास दीपा." मी पपांकडे पाहिलं. "हा आम्ही मनालीला गेलो होतो तेव्हा काढलेला. तू हॊस्टेलवर असायचीच तेव्हा. रश्मी गेली आणि सुनीता आली माझ्या आयुष्यात. तेव्हाही तशीच होती जशी आतापर्यत होती तशी. हवीहवीशी वाटणारी.देखणी , सुरेख. रश्मीची जागा तिन कधीच भरुन काढली होती. आधार होता तिचा मला.अस एकदम जाणं, काहीही ज़ाल नसताना?? काही करायची संधीच दिली नाही तिन" पपांना पुढे बोलवेना
"पपा शांत व्हा पहा अगोदर" मी खोल आवाजात म्हटल
पपा ओल्या डोळ्यांनी फ़ोटोकडे पाहत राहिले.

मम्मी दुसरेपणावर आमच्या घरात आल्या होत्या. माझ्या सख्या आईच्या मृत्यूनंतर पपांनी दुसर लग्न केल होत. खरतर आपल्या आईच्या जागी दुसर्या बाईला आई म्हणून स्वीकारण मला रुचल नव्हत. पण नानीन माझी समजूत काढली होती. सुरुवातीला मला अवघड वाटल पण नंतर मला सवय झाली. शांळकरी होते मी तेव्हा. आईच्या जाण्यानंतय एकट वाटू लागल होत. पपांचा बिझीनेसमध्ये जम होता तरी पूर्णवेळ माझ्याकडे लक्ष देण त्यांना जमणार नव्हतं

तशाही ममी वाईट नव्हत्या. गोष्टीतल्या सावत्र आईप्रमाणे त्यांनी माझा कधी छ्ळ केला नसला तरी आमच्यात बंध वगैरे नव्हते. आम्ही दोघीही एकमेकाना संभाळून असू. माझ्या जीवनशैलीत हस्तक्षेप ममींनी कधी केला नाही आंणि मी ही कधी करु दिला नाही. थोडक्यात नात्यात मिठाईचा गोडवा नसला तरी कारल्याचा कडवटपणाही नव्हता.

ममीच्या आगमनानंतर तीन वर्षानी समीर जन्माला आला. कुरळ्या केसांचा गोबर्या गालाचा समीर मला खूप आवडला होता. लहान मूल असतातच म्हणा तशी. त्याचे लाड करायला मला फार आवडायच. गट्टीच जमली होती.

समीरच्या जन्मानंतर पपांच प्रेम आम्हा तिघात वाटल गेल. पण या गोष्टीचा विचार करायला मला वेळ नव्हता. शाळा, क्लासेस , अभ्यास, परीक्षा, मित्र मैत्रीणी यात मी पुरती गुरफूटून गेले होते. विचार करायलाही वेळ नवह्ता. दहावीनंतर उच्च शिक्षणासाठी मला दुसरीकडे पाठवण्यात आल. पप्पांची ईच्छा मी आर्किक्टेट व्हाव अशी होती. मलाही ईंटरेस्ट होताच. या सगळ्यामुळे माझा घराशी असलेला सबंध जवळजवळ तुटलाच होता. कॉलेजात मी पार रमून गेले होते. दर आठवड्याचा फोन आणि सुट्टीत सणाना घरी जाण एअव्ढच काय ते घर!!! माझ एकटीच अस जग आता निर्माण झाल होत. त्यातच मी रमले होते.या एकटेपणात माझ्या साथीला होत ते माझ आवडत टेडी बेअर.रात्री झोपताना किंवा कधी अगदीच एकट वाट्ल असताना टेडीच माझा मित्र बनला.

माझ्या सुख आणि दुखाच्या गोष्टी मी त्याच्याशी बोलत असे. एका खेळण्याशी मी एकटीच बोलत असे हे पाहून समीर कधी कधी माझी खिल्ली ऊडवायचा. पण मी कधी पर्वा केली नाही. का कोण जाणे पण त्याच्याशी बोलताना, खेळताना मी माझ्या आईशीच बोलतेय अस वाटायच. त्याच्या डोळ्यात एक प्रकारचा स्निग्धपंणा मला दिसायचा. माझे पपा खर्या अर्थान व्यवसायिक. ईतर मुलीसारख भातुकलीचा डाव मी कधी मांडला नाही. तेवढा वेळ तस वातावरण्ही नव्हत घरी. आधी शाळा कॉलेजची रॅट रेस, नंतर बिझनेस ग्रोथ बॅलन्सशीट, प्रॉफिट आणि ते चक्रच. यात अ़क्षरश स्वतचा विचार करायलाच सवड नव्हती. डेडलाईन पूर्णत भिनल होतं अंगात. त्रास होत होता. पण प्रोजेक्ट पूर्ण ज़ाल्यानंतरचा आनंद सगळा थकवा घालवी. फ़िक्कीच यंग आंत्रप्रुन्यर अवॉर्ड जेव्हा मिळाल तेव्हा आकाश मिळाल्यासारख वाटल. ते यश, तो आनंद, ती सत्ता आता हवीहवीशी वाटु लागली. आवडायला लागली. स्वतच्याही नकळत.‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌
‍_____________________________________________________________________________________________
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फणसाच्या आठळ्याची भाजी

 तर मग झाल अस की फणस घरी आणवून, अस्मादिकाना टुकटुक करून, घरच्या मेंब्र गरे खाऊन मोकळी झाली . उरल्या त्या आठळ्या! आंब्यांच्या कोयीप्रमाणे त्य...