हरिहरन
मुख्यत ओळखला जातो
ते त्याच्या गझलासाठी
. त्याच्या गझलांची स्वताशी
अशी स्वतंत्र शैली
आहे. आवाजत काहिसा
संथपणा , एक प्रकारचा
गोडवा या दोन्हीच
मिश्रण आहे जे
गझल गायकीला उपयुक्त
ठरत.
मात्र गझलेपुरती हरिहरनची गायकी मर्यादित नाही. अनेक चित्रपटातील गाण्याना त्याच्या मुलायम आवाजाचा परिसस्पर्श झालेला आहे.
सुरुवात करायची झाली तर रोजाच्या रोजा जानेमन गाण्यापासून करता येईल . बॉम्बे मधल्या तू ही रे या गाण्यातल्या मौत और जिंदगी तेरे हाथोमै दे दिया रे या शांत आवाजातल्या ओळि अंगावर अक्षरश काटा आणतात..
माचिस मधल्या छप्पा छप्पा चरखा चले या गाण्यात सुरेश वाडकरांना त्याने तोलामोलाची साथ दिली आहे. अजून एक उल्लेखनीय गाण म्हणजे हम दिल दे चुके सनम मधल "झोंका हवाका आज भी झुल्फे उड़ता होगा ना."
गाण्याची सुरुवातच इतकी जबरदस्त आहे .
हरिहरन खिळवून ठेवतो अक्षरश: यात. ' क्या तुम मेरे इन सवालों का कुछ तो जवाब दोगी ना ' या गाण्याच्या शेवटाच्या ओळी आपल्यालाही हेलावून सोडतात.
पण हरिहरनने गायलेल माझ सर्वात आवडत गाण म्हणजे ताल चित्रपटातल ' नही सामने ये अलग बात है '
अतिशय शांत स्वरातल हे गाण मनावर एक वेगळ गारुड करून जात..
लॉन्ग ड्राइव करत असताना आर्वजून ऐकावस वाटणार ..
सुरुवातीला ' देखो छोडके इस दिलको जाते है । सारे रस्ते वापस मेरे दिलमे आते है । या ओळी एक सुंदर गाण ऐकायला मिळणार याची नांदी करून देतात . हरिहरनच्या मखमली आवाजात बुडून जायची ती सुरुवात असते ..
मानव ( अक्षय खन्ना )त्याच्या प्रेयसीपासून दुरावला आहे . ती ( मानसी =ऐश्वर्या) आता विक्रांत (अनिल ) सोबत आहे . कोठल्याही प्रेमात येणारे समज गैरसमज त्यांच्याही नात्यात आलेत . मात्र त्यावर समजुतीने तोडगा काढण्याऐवजी दोघांमधली दरी अधिकच रुंदावत गेलीये .
दोघांचे रस्ते वेगळे झालेत. कधीही एकत्र न येण्याइतके..
चित्रपटाच्या या पार्श्वभूमीवरच हे गाण हरिहरनच्या आवाजात येत तेव्हा नकळत आपण त्या आवाजाशी एकरूप होऊ लागतो .
मानसीच्या जाण्याने सैरभैर झालेला मानवला आता काही सुचत नाही. मात्र त्याच वेळी आपल्या प्रेमावरचा त्याचा विश्वास दृढ़ आहे.
नही सामने ये अलग बात है
मेरे साथ है तू , मेरे पास है ।।
ती कुठेही असली तरी ती त्याच्या सोबत आहे. शारीररुपाने दोघे एकमेकांच्या जवळ नसले तरीही तिच्याही मनात आपण आहोत , मला सोडून ती कुठेही गेली नाहीये , इथेच आहे माझ्याजवळ मनोमनी विश्वास दाटलाय .
तेरा नाम मैंने लिया है यहा
मुझे याद तूने किया है वहा
बड़े जोर की आज बरसात है
बड़े जोर की आज बरसात है
फक्त मलाच तुझी आठवण येतेय असे नाही. तू सुद्धा तितकीच व्याकुळ आहेस . आणि ते मला जाणवतेय. बघ हां जोरात पड़णारा पाऊस याची साक्ष देतोय.
इथे हरिहरनचा संथ वाटणारा आवाज शेवटी आर्ततेत बदलून जातो. एक अप्रतिम मास्टरपीस नकळत आपल्याला मिळून जात.
बिछड़ के भी मुझसे जुदा तो नही
खफा है मगर बेवफा तो नही
मेरे हाथ मै ही तेरा हाथ है
माझ्यापासून दूर आहेस पण वेगळी झाली नाहीयेस . अजूनही आपण एकच आहोत. नाराज आहेस मान्य आहे पण मला सोडून नाही गेलियेस.
माझ्या हातात तू दिलेला तुझा हात अजूनही तसाच आहे कायम ...
दोन कडव्याच्या ह्या सुंदर गाण्याला हरिहरनच्या जादुई आवाजाने चारचाँद लागतात. आनंद बक्षीचे शब्द , त्यावर रहमानी संगीताचा साज ही अजून वैल्यू addition..
सुरुवातीला आणि शेवटी सुखविंदर ही कैसीssss शब्दात सुरुवात आणि शेवट करून स्वतच्या आवाजाची रेंज दाखवून देतो.
या गाण्यात हरी आपल्याला एक उत्कट अशा प्रेमभावनेचा अनुभव देण्यात यशस्वी ठरतो. अतिशय तलम असे हरीहरनचे सूर मनाला स्पर्शून जातात. मनाचा ठाव घेतात आपल्या.
इतक सुंदर गाण खरतर पड़द्यावर तितकस प्रभावी ठरत नाही अस मला वाटत.
याला कारण अक्षय खन्ना आहे की छायाचित्रण / दिग्दर्शन हे नीट ठरवता येत नाही. अक्षय खन्नाच्या जागी शाहरुख आठवत राहतो. शाहरुखच्या अभिनयक्षमतेबद्दल कितीही प्रवाद असले तरीही प्रेमकथेत तोच हवा . बॉलीवुडचा रोमान्स त्यानेच करावा.
म्हणूनच हे गाण फक्त ऐकाव आणि अनुभवाव
अजून काय ? बस्स !! हरिहरनचा आवाज पुरेसा आहे अनुभूती यायला.....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा