सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४

हुंदका !



ते चार शब्द वाचताच खण्णकन मुस्काटात माराव तस तिला झाल . बाजूलाच असलेल्या भिंतीवर अक्षरश गळुन पडली. झाडावरुन कोसळलेल्या पानाप्रमाणे ! काही सुचलच नाही त्या वेळेस .
काय झालय ते मेंदूला कळत होत पण मन मान्य करत नव्हत . आतून एकच आवाज हे चूक आहे , अस घडण शक्यच नाही .
पण ते बोलायला तरी कुठे धाडस होत .

मटकन खाली बसली तेव्हाच त्या शब्दाची अपरिहार्यता आत आरपार गेली होती . त्या भेदकतेने जणू शक्तिपात झालेला
निर्वात पोकळीसारखी शून्यवत अवस्था .. भयानक रिकामेपण ...

जे निसटून गेलय तो परत येण अशक्य . निव्वळ अशक्य . पाठी राहिल्यात त्या चुका . सोबत करण्यार्या . डिवचण्यार्या .. काही आनंदी क्षण . पूरचुंडीसारखे गाठीस असलेले.

जीवनातल्या मृत्यू नामक सत्याची झालेली ही दूसरी ओळख .. या ओळखिन तिला पार दमवुन टाकल . अस का , कशाला , काय गरज आहे, किती बाकी होत आयुष्य या प्रश्नाना कधीच उत्तर मिळणार नव्हत . तो हिरवा दिवा आता लागणार नव्हता . वाद घातले जाणार नव्हते .आता तिथे कोणीच नसणारे .. अनंताच्या प्रवासाला जाणारे परत येत नाहीत .कधीच नाही

काही वेळाने अस्फुट्स अस बाहेर आल .
पाठोपाठ रड ! कडवट सत्य जाणिवे नेणिवेन स्वीकारल गेल्याची खुण ..
********************************

आजही तो हुंदका बाहेर येतो . पण आता तो दाबून टाकता येतोय तिला
त्या एक पाण्याच काय करायच हे मात्र समजल नाही अजून ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फणसाच्या आठळ्याची भाजी

 तर मग झाल अस की फणस घरी आणवून, अस्मादिकाना टुकटुक करून, घरच्या मेंब्र गरे खाऊन मोकळी झाली . उरल्या त्या आठळ्या! आंब्यांच्या कोयीप्रमाणे त्य...