शनिवार, ११ जुलै, २०२०

दिवे

काही महिन्यांपूर्वी एका कॅम्पला गेले होते .इगतपुरीजवळ. भारतातील इतर गावांसारखं एक ते गाव.. अलंग मलंग पर्वताच्या कुशीत अगदी दुपडून बसलेल ..येताना आम्हाला टॉर्च आणा अस सांगितलेल. गावात शहरासारखा उजेड नाही हे माहिती असतं. त्यामुळे तेव्हा काही वाटलं नाही.
पण या गावातील अंधार कल्पनातीत घनदाट होता. इतका की उजेड नावाची गोष्ट फक्त सूर्यास्तपर्यत . हल्ली हल्ली कोणत्यातरी कंपनीच्या सीएसआर फंडामुळे जनरेटरची सोय झालेली . ती ही त्या गावात येण्याऱ्या पर्यटकांपुरती . नाहीतर सगळीकडे अंधारच . त्याच्या परिणाम इतर गोष्टींवरही झालेला. पण जगण्याची उर्मी चिवट असते म्हणून जगत असतात माणसं ..तशी तिथेही लोक जगतात..
दोन मिनिटं जरी लाईट गेली / एसी बंद पडला तर कासावीस होण्याऱ्या जमातीतले आम्ही . तिथला तो डोळ्यात बोट जाईल इतपत अंधार खुपयला लागला . कुठल्याही गोष्टीचा पॉझिटिव्ह दृष्टीकोण बघा या अपरिहार्य मानवी वृत्तीने अरे बघा, अंधेरीला आलो , अंधेरी रातोमे वगैरे जोक्स मारून झाले .. कसे राहतात ना लोक म्हणून हळूहळून देखील झालं . ते तेवढ्यापुरते राहील , पुढे काही होणार नाही हे जाणवत होतच . ते तसच ठेवून परत आलो ..
कोरोनामुळे सक्तीने घरात बसावे लागलेल्या लोकांना उभारी मिळावी म्हणून दिवे लावणार आहेत, हा कोरोनाविरुद्धचा लढा आहे त्याच बरोबर अचानक वीज गेल्याने ट्रीपिंग फेल होईल वगैरे ठीक ! पण ह्या सगळ्या चर्चेचा अंश त्या गावापर्यंत किंवा अश्या अनेक खेड्यापर्यत पोचत असेल का ? जी गोष्ट एकजूट दाखवायची म्हणून डोक्यावर छपर असलेले , ४ भिंतीत सुरक्षित राहणारे ममव लोकं करणार आहेत त्या गोष्टीकडे जगण्याला पर्याय नाही म्हणून अंगवळणी पडून घेतलेले लोक कसे पाहत असतील ? ७० वर्षे सहन करत असलेल्या ह्या अंधार करोनाचा सामना कस करत असतील ? की सगळ्याच सोयरसुतक नसेल ! की करोना म्हणजे काय हे ही माहित नसेल ? कधी त्यांच्याही आयुष्यात सूर्यास्तनंतर दिवे उजळतील का ?
का मग सुरेश भट म्हणतात तस
"उपाशी लोकहो आली दिवाळी राजपुत्रांची |
दिवे जाळून रक्ताचे करा अंधार आनंदी | ' ही अवस्था कायम राहील ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फणसाच्या आठळ्याची भाजी

 तर मग झाल अस की फणस घरी आणवून, अस्मादिकाना टुकटुक करून, घरच्या मेंब्र गरे खाऊन मोकळी झाली . उरल्या त्या आठळ्या! आंब्यांच्या कोयीप्रमाणे त्य...