![]() |
फोडणीचा / मसाले भात ~Fodnicha Bhaat / Masale Bhaat |
माझी आई नोकरी करायची . त्यामुळे रोजच शाळेत पोळी भाजी , चपातीचा डबा देणं तिला जमायचं नाही. रोज रोज चपाती भाजी खाऊन आम्हालाही कंटाळा यायचा. पास्ता , मॅगी , मॅक्रोनीला शाळेत अघोषित बंदी होती आणि तसेही ९० च्या दशकात हे पदार्थ रुळले नव्हते तितके . त्यावर तोडगा म्हणून एक दिवस हा फोडणीचा भात डब्यात असायचा. आदल्या रात्री आई मुद्दामहुन भात जास्त करायची आणि सकाळी हा भात डब्यात असायचा.. ज्या दिवशी फोडणीच्या भाताचा डबा असायचा त्यादिवशी मी जामच खुश असायचे. मला दोन दोन डब्बे दे असा माझा हट्ट असायचा तेव्हा. पुढे मोठं झाल्यावर भाताने वजन वाढत असा शोध(?) लागला त्यामुळे भात खाणं कमी केलं . पण शेवटी जीन्स पडले कोकणी माणसाचे . राहवणार थोडंच भाताशिवाय . त्यामुळे संकल्प बारगळला.😛😛
हा पदार्थ करायला एकदम सोपा. आवडता पदार्थ असल्याने आई करायची तेव्हा तिच्या बाजूला उभं राहून बघितलं होतंच . फोडणीचा नुसता सुगंध भूक चाळवतो . तर कढईत चवीनुसार लाल तिखट कांदा टोमाटो, लसूणची फोडणी करायची , हळद ऑप्शनल . आणि उरलेला भात त्यात टाकून मस्तपैकी परतून घ्यायचा. वर थोडावेळ गॅसवर ठेवून खायला घ्यायचा . अहाहा ! कसली भारी चव लागते . खरतर उरलेला भात खपावा म्हणून ही युक्ती करतात पण मी ताज्या भाताचंही कधी कधी करते . चवबदलीसाठी . पुलाव वगैरे करायला जेवढे श्रम लागतात त्याच्या अर्ध्याहून कमी श्रमात हा भात होतो आणि चविष्टही लागतो . आज केलेल्या फोडणीच्या भाताचा फोटू ! एन्जॉय 😎
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
My Mother was working woman . So everyday it was not possible for her to do Poli Bhaji for our school tiffin . We were also sometimes got bored by eating same. Further our school didn't allow pasta , Maggie in tiffin.So My mother had this idea . All she had to do is cook some extra rice on earlier day and make this stuff on next morning . I used to be very happy on that day and asked my Aai to get me extra tiffin.
Later on I found that Rice was responsible for gaining weight , hence stopped eating . However being pure konkanni , i couldn't restrained myself from that very long 😛.
Receipe is very simple. All you have to do is take Pan . Pour some oil , put Laal Tikhat ,chopped onion , tomato and garlic into it. . Turmeric is optional . Then put leftover rice into the pan and mix it well. Keep the same in gas for sometime..Your Fodnicha Bhaat is ready . See how simple it is !!! Easier to made than pulav and other type of rice delicacy ..
So here is photo of today's Fodnicha Bhaat... Enjoy 😊
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा